OLX Fraud: ओएलएक्स वरून दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज: ओएलएक्सवर जुने सामान विकण्याची जाहिरात दिलेल्या एका व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक झाली. एका व्यक्तीने सामान खरेदी करण्याच्या बहाण्याने क्युआर कोड पाठवून त्याआधारे पैसे ट्रान्सफर करून घेतले.(OLX Fraud) हा प्रकार 6 ऑगस्ट रोजी रात्री नवीन म्हाडा कॉलनी, मोरवाडी येथे घडला.

आशिष विजयप्रसाद वैष्णव (वय 37, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : शहर काँग्रेसकडून आझाद गौरव यात्रा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील जुने सामान विकण्यासाठी ओएलएक्स वर जाहिरात दिली होती. ते सामान खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादी यांना संपर्क केला.(OLX Fraud) त्यांनतर फिर्यादी यांना सहा क्यूआर कोड पाठवून ते स्कॅन करायला लावले. त्यांनतर त्याच्या बँक खात्यावर 50 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगून त्यांची एक लाख 49 हजार 990 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.  या प्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.