सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pimpri Crime: विवाहितेला मारहाण करत भावाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : विवाहितेने सासरी न नांदण्याचा निर्णय घेतल्याने सासरकडील सामान आणण्यासाठी विवाहिता तिच्या घरच्यांसोबत गेली असता त्यांना मारहाण करून (pimpri Crime) विवाहितेच्या भावाला गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी सासरच्या लोकांनी दिली. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत पिंपरी येथे घडला.

पती आशुतोष नरेश चंदीरमाणी (वय 29), सासरे नरेश के चंदीरमाणी (वय 55), सासू (वय 50), नणंद (वय 24), प्रवीण तोतलाणी (वय 30), दोन इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri News: पिंपरी-चिंचवड शहरातून 71 हजार किलो प्लास्टीक संकलीत, महापालिकेनी शहरात राबवली प्लॉगेथॉन मोहिम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा आशुतोष याच्यासोबत 15 जुलै 2021 रोजी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर दोन महिन्यांपासून सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे त्यांनी सासरी न नांदण्याचा निर्णय घेतला.(Pimpri Crime) सासरकडील सामान आणण्यासाठी फिर्यादी, त्यांची आई, वडील, भाऊ यांच्यासह सासरी गेल्या असता आरोपींनी त्या सर्वांना मारहाण केली. आरोपी प्रवीण याने त्याच्याकडील परवाना असलेली पिस्टल काढून फिर्यादीच्या भावाला  गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. य़ाप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news