Chakan News: शिवजयंती निमित्त ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धा

पी के फाउंडेशन संचलित पी के टेक्निकल कॅम्पसच्या वतीने आयोजन

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पी के टेक्निकल कॅम्पसच्या वतीने ऑनलाइन पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी असून 14 फेब्रुवारी पर्यंत स्पर्धकांनी आपले व्हिडीओ पाठवावेत. 16 फेब्रुवारी रोजी निकाल आणि शिवजयंती दिवशी (19 फेब्रुवारी) बक्षीस वितरण होणार आहे, अशी माहिती पी के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी दिली. 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी केली जाते. यावेळी शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पी के टेक्निकल कॅम्पसच्या वतीने यावर्षी ऑनलाइन पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पी के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.प्रतापराव खांडेभराड यांनी दिली.विद्यार्थ्यांच्या वाचनात शिवरायांचा इतिहास यावा यातून प्रेरणा घेऊन त्यांनी शिवचरित्र वाचावे,देशप्रेम जागृत व्हावे, मन,मनगट आणि मेंदू केवळ आणि केवळ मातृभूमीच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वापरले जावे.यादृष्टीकोनातून पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा ही सर्व वयोगटासाठी खुली आहे.या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी तसेच इतरांनी  आपला पोवाडा दि 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत  9146034239 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.या स्पर्धेचा निकाल 16 फेब्रुवारी 2022 रोजी लागणार असून संबंधित स्पर्धेचा बक्षीस वितरणसोहळा 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी नऊ वाजता पी.के टेक्निकल कॅम्पस कडाचीवाडी,चाकण येथे होणार आहे.

पोवाडा गायन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रु.सात हजार, द्वितीय क्रमांक रु.पाच हजार तर तृतीय क्रमांकासाठी रुपये तीन हजार अशी रोख बक्षिसे  ठेवण्यात आलेली असून विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  देखील देण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील अधिकाधिक कलावंतांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे अवाहन पी के फाऊंडेशन च्या वतीने करण्यात येत आहे.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.