Chakan : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचा (Chakan) मोबाईल दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 13 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास चाकण तळेगाव रोडवर चाकण येथे घडली. याप्रकरणी 3 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे.

पवन यशवंत रोकडे (वय 27, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन मधुकर शिंदे (वय 30), सुनील चंद्रकांत खैरनार (वय 31, दोघे रा. नाणेकरवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Chikhali : प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाची बॅग चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी पवन रोकडे हे चाकण तळेगाव रोडने पायी चालत जात होते. त्यावेळी अनोळखी दोघेजण दुचाकीवरून (Chakan) आले. त्यांनी पवन यांच्या हातातून 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.