Chikhali : प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाची बॅग चोरीला

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे स्टेशन ते पूर्णानगर चिंचवड (Chikhali) या दरम्यान प्रवास करत असताना एका वृद्ध व्यक्तीच्या ताब्यातून कॅमेऱ्याची बॅग आणि सोन्याची साखळी चोरीला गेली. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी घडली.

याप्रकरणी ओमाना कुट्टन नारायणन (वय 73, रा. पूर्णानगर चिंचवड) यांनी बुधवारी (दि. 3) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : महात्मा फुले महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फेब्रुवारी महिन्यात कन्याकुमारी येथे गेले होते. कन्याकुमारी येथून ते पाच फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकावर आले. त्यानंतर फिर्यादी पुणे रेल्वे स्टेशन ते पूर्णानगर चिंचवड येथील आपल्या घरी आले. या प्रवासात त्यांच्या ताब्यातून कॅमेऱ्याची बॅग आणि सोन्याची साखळी असा एकूण 1 लाख 500 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.