Pimpri : महात्मा फुले महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज : पिंपरी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या (Pimpri) सर्वांगीण विकासासाठी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक गेल्या चाळीस वर्षांपासून अविरतपणे झटत आहेत. बदलत्या काळाची आव्हाने ओळखून शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित बदल महाविद्यालय सातत्याने करीत आहे. त्यामुळेच कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, शिक्षण, अर्थकारण, उद्योग, व्यवसाय, संशोधन, प्रशासनाच्या विविध क्षेत्रात विद्यार्थी आपला ठसा उमटवीत आहेत, असा मनोदय माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल मासुळकर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे होते. विद्यार्थ्यांना केंद्रवर्ती ठेवून महाविद्यालय विविध उपक्रम राबवीत असते. तसेच महाविद्यालयाविषयी विद्यार्थ्यांच्या मनातही कृतज्ञता भाव असतो. ही कृतज्ञता कधी बौद्धिक व्याख्यानांच्या माध्यमातून व्यक्त होते, तर कधी आर्थिक मदतीच्या रूपाने होते. या महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची महाविद्यालयावरील निष्ठा अद्वितीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘नॅक’ मानांकनात माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असते. आणि ही भूमिका विद्यार्थी अत्यंत निष्ठेने पार पाडतात याविषयी (Pimpri) मनस्वी समाधान वाटते, असा मनोदयही पुढे त्यांनी व्यक्त केला.

सदर कार्यक्रमात अत्यंत कमी कालावधीत चौथ्या ‘नॅक’ मानांकनासाठी एस. एस. आर. यशस्वीपणे आभासी पद्धतीने जमा केल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांचा माजी विद्यार्थी संघटनेकडून सन्मान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रो. डॉ. माधव सरोदे, कला शाखा प्रमुख डॉ. मृणालिनी शेखर, डॉ. प्रो. डॉ. भारती यादव, प्रो. डॉ. संगीता अहिवळे, प्रो. डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. शहाजी मोरे, डॉ. मिलिंद भंडारे, डॉ. नीलकंठ डहाळे, प्रा. संदीप नन्नावरे, प्रा. स्वप्ना हजारे, लेफ्टनंट प्रा. प्रसाद बाठे, डॉ. प्रज्ञा भरड, डॉ. सोनल बावकर, प्रा. माधुरी सावंत यांना माजी विद्यार्थ्यांकडून सन्मानित करण्यात आले.

Pimpri Crime – ब्रँडेडच्या नावाखाली नकली कपडे विकणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल

महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत, कोविडग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत,वॉटर कुलर यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा. बाळासाहेब वाघेरे यांनी एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची मदत केली. संशोधन वृत्ती वाढीस लागावी यासाठी मा. जालिंदर कातकडे यांनी एक लाख पन्नास हजार रुपयांची मदत केली. वार्षिक अंक ‘शाल्मली’ साठी मा. विशाल मासुळकर यांनी पंचवीस हजार  रुपयांची मदत केली, त्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.

याबरोबरच संशोधन, कला, सामाजिक, राजकीय, क्षेत्रात कार्य केलेल्या सम्रीता भट, आशा साळुंखे. डॉ. अशोक बनकर,  प्रिया मौर्य,  मशिरा शेख, डॉ. प्रेरणा उबाळे, डॉ. दिनेश गरुड, प्रज्ञा पाटील आणि  इम्रान  शेख यांनाही महाविद्यालयातर्फे सन्मानित करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सामिलकीचा वसा जपत कोविड-19  प्रतिबंधक साहित्य पुरवठा केल्याबद्दल दीपक पाटील,  संदीप पाटील,  योगेश पाटील,   प्रदीप लोखंडे,  अमोल तापकीर,  सचिन नलावडे,   योगिता चव्हाण,  नयना उदय,  दीपाली शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब वाघेरे,  दत्ता वाघेरे,  जालिंदर कातकडे, प्रबोधनकार (Pimpri)  शारदा  मुंडे आणि अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच सुम्रिता भट (कॅनडा), संगीता रैना, (अमेरिका), धनश्री चव्हाण (ऑस्ट्रेलिया),  स्वाती अतोळे (ऑस्ट्रेलिया), श्याम गोसावी (ऑस्ट्रेलिया), गिरीश कोळी (सिरम इन्स्टिट्यूट),  विनायक पवार यांनी ऑनलाईन मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रो. डॉ. माधव सरोदे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. शहाजी मोरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. प्रतिमा कदम यांनी केले. कार्यक्रमास माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.