Pimpri Crime-ब्रँडेडच्या नावाखाली नकली कपडे विकणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ब्रँडेड कपडे असल्याचे भास होऊन नकली कपडे विकणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 3) पिंपरी मार्केट मधील (Pimpri Crime)दोन दुकानांमध्ये करण्यात आली.

अमीर करीम शेख (वय 20, रा. पिंपरी गाव), पियुष राम तेलवाणी (वय 19, रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दुकानदारांची नावे आहेत. या प्रकरणी महेश विष्णू कांबळे (वय 39, रा. नवी दिल्ली. मूळ रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस (Pimpri Crime)ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : पुण्यात प्रतिकात्मक कुस्ती लावून ब्रिजभूषण सिंह यांचा निषेध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीचे स्वामित्व असलेले कपडे असल्याचे भासवून आरोपींनी त्यांच्या दुकानांमध्ये बनावट कपडे विक्रीसाठी ठेवले. आरोपी शेख याने त्याच्या दुकानात दोन लाख 70 हजार 400 रुपये किमतीचे 390 नग बनावट टी-शर्ट, शॉर्ट पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट असे विक्रीसाठी ठेवले. तर आरोपी तेलवाणी याने त्याच्या दुकानामध्ये एक लाख 59 हजार 900 रुपये किमतीचे 367 नग बनावट टी-शर्ट, टी-शर्ट, शॉर्ट पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट विक्रीसाठी ठेवले. हा प्रकार निदर्शनास येताच फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन्ही दुकानदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस (Pimpri Crime)तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.