Chinchwad News : चिंचवडमध्ये आज गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : चिंचवडमध्ये गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी होणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.याबाबत आनंद भोईटे, पोलीस, उप-आयुक्त वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड शहर यांनी आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा.फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) व्यतिरिक्त इतर वाहनांना हे नियम लागू असतील.

चिंचवडमधील अहिंसा चौक ते चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.त्यांनी एस. के. एफ. चौकातून खंडोबामाळकडून मुंबई- पुणे हायवे रोडने इच्छित स्थळी जावे.

दळवीनगर ब्रिजकडून चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.त्यांनी एस. के. एस. टोकाकडून बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जावे.

वाल्हेकर वाडी टी जंक्शनकडून चाफेकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्यांनी वाल्हेकरवाडी जुना जकात नाका येथून डावीकडे वळून जय शाळेपासून बिजलीनगर अथवा एस. के. एस मार्गे खंडोबा माळ मार्गे इच्छित स्थळी जावे.

लिंक रोडवरून चाफेकर चौकातील पीएमटी बस स्टॉप येथून चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.लिंक रोडने येणाऱ्या वाहन चालकांनी डावीकडे वळून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळे जावे.

भुई अळी तसेच चिंचवड चौकी येथून चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.ही वाहने केशवनगरमार्गे इच्छीत स्थळी जातील.

Vadgaon Maval : बेबडओहोळच्या उपसरपंचपदी कमल गराडे बिनविरोध

चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. ही वाहने रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी व अहिंचा चौक ते महावीर चौक किंवा एसकेएफ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

चिंचवड वाहतूक विभागाच्या हद्दीत गणपती विसर्जन व मिरवणूक असल्याने 9 सप्टेंबरला दुपारी 3 वा. ते मध्यरात्री 12 वा.पर्यंत वरीलप्रमाणे वाहतूक नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक विभागाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.