Mulshi News : द न्यू डेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये चिमुकल्यांनी बाप्पाला दिला निरोप

एमपीसी न्यूज – मुळशी येथील घोटावडे गावातील शंतनू श्रीकांत शिक्षण संस्थेच्या द न्यू डेल इंग्लिश मिडीयम स्कूलमधील चिमुकल्यांनी शुक्रवारी (दि.9) त्यांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

या वेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता खोजे, संचालक साहेबराव भेगडे, उपप्राचार्या संगिता रॉय, वर्षा बरबडे, मनिषा साबळे, अश्विनी, श्रध्दा शिंदे, अक्षदा, पुनम, प्रिती, काजल, ऋतुजा, रेखा झोरी, योगेश महाडिक आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

शाळेत गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.या वेळी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच रोज बप्पाची पुजा व आरती असा कार्यक्रम घेण्यात आला.शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल, लेझीम, ताशा या पारंपरिक वाद्यांच्या तालात मिरवणूक काढत लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.