मंगळवार, नोव्हेंबर 29, 2022

Charholi burglary : चऱ्होलीत भर दिवसा सव्वा लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज – चऱ्होली बुद्रुक येथे भर दिवसा घरफोडी (Charholi burglary) करून चोरट्याने एक लाख 26 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि.23) सकाळी साडेनऊ ते रात्री आठ वाजताच्या कालावधीत घडली.

सचिन शिवाजी चव्हाण (वय 41, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : इंद्रायणी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी रविवारी भोसरीत रीव्हर सायक्लोथॉन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचे लॅचलॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून एक लाख 26 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने (Charholi burglary) आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Latest news
Related news