Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्य नेता म्हणून निवड

एमपीसी न्यूज : शिवसेनाचे मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना मान्यता मिळाली आहे . शिवसेनेचे सर्व अधिकार यांच्याकडे देण्याचा निर्णय पक्षाच्या (Maharashtra) राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेण्यात आला आहे. निवडणूक आयागाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आज पक्षाची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठर पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

शिवसेना पक्षाविरोधात वर्तणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी एका समितीचे गठण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच निवडणूक आयोगासंदर्भात ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याविरोधात निषेचा ठराव देखील या बैठकीत मांडण्यात आला आला.

Sansad Ratna Award 2023 : संसदरत्न पुरस्काराची घोषणा, महाराष्ट्राच्या चार खासदारांचा समावेश

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून आता शिस्तभंग समिती स्थापन केली जाणार असून या समितीमध्ये दादा भुसे शंभूराजे देसाई आणि संजय मोरे असणार आहे अशी माहिती आहे. ही समिती पक्षविरोधी वर्तवणूक करणाऱ्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. 

शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

१) चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे.

२) राज्यातील सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना 80 टक्के नोकरीमध्ये स्थान देण्याचे निर्णय.

३) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय.

४) स्वातंत्र्यवीर सावकरकर यांना ‘भारतरत्न’ देणे. लोकसभा गट नेते खासदार राहुल शेवाळे यांनी सर्वात प्रथम लोकसभेत ही मागणी केली होती.

५) UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.