Today’s Horoscope 22 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 February 2023
वार – बुधवार.
22.02.2023
शुभाशुभ विचार- शुभ दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा.
चंद्र राशी – मीन.
—————————————-
मेष (शुभ रंग – पांढरा)
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे, सावध रहा.

वृषभ (शुभ रंग – गुलाबी)
नोकरी धंद्यातील काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्या मंडळींपासून दोन हात दूरच रहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. पिताश्री आज योग्यच सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कामाला लागा. प्रथम कर्तव्यास प्राधान्य द्या.

कर्क (शुभ रंग – स्ट्रॉबेरी) – Today’s Horoscope 22 February 2023
नोकरी धंद्याच्या ठिकाणी आज काही मनाविरुद्ध घटना घडू शकतील. हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. झटपट लाभाचा मोह करून चालणार नाही आपल्या मर्यादेत रहा.

सिंह (शुभ रंग – मरून)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. कोणत्याही मोठ्या उपक्रमांची सुरुवात उद्यावरच ढकला. आज जेष्ठांची पावले सत्संगाकडे वळतील. आज व्यर्थ वादविवाद टाळा.

कन्या (शुभ रंग – आकाशी)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. कार्यक्षेत्रात काही फसव्या संधी येतील सतर्क रहा. भागीदारीच्या व्यवहारात काही सौम्य गैरसमज संभवतात.

तूळ (शुभ रंग – निळा)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका पती-पत्नी मधील काही मतभेद सामंजस्याने मिटू शकतील.

वृश्चिक (शुभ रंग – केशरी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हे वाटेल.

धनु (शुभ रंग – भगवा)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावरचे व्यवहार लाभच देतील. मातोश्रींचे सल्ले महत्वपूर्ण असतील.

मकर (शुभ रंग – लाल)
नवीन झालेल्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

कुंभ (शुभ रंग – मोतिया)
धंद्यातील येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक मनाजोगती असली तरीही अनावश्यक खर्च थांबवायला हवेत.

मीन (शुभ रंग – जांभळा)
महत्त्वाच्या चर्चेत आज इतरांचंही म्हणणे ऐकून घ्या समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान असू द्या तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्य नेता म्हणून निवड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.