Chikhali: महापौरांच्या प्रभागातील रस्त्यावर 22 कोटींचे डांबर; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या प्रभाग क्रमांक दोन जाधववाडीमधील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 22 कोटी 32 लाख रुपये खर्च येणार असून याबाबतच्या प्रस्तावाला आज (सोमवारी) झालेल्या विशेष सभेत स्थायी समितीने मान्यता दिली.

महापौर राहुल जाधव जाधववाडीचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या प्रभागातील जाधववाडी, कुदळवाडीतील अस्तित्वातील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. निविदा रक्कम 24 कोटी 13 लाख रुपये होती. त्यातून रॉयल्टी व मटेरीयस टेस्टींग चार्जेस वगळून 23 कोटी 89 लाख रुपयांची निविदा मागविली होती.

कृष्णाई इन्फ्रा या ठेकेदाराची 23 कोटी 89 लाखापेक्षा 7.60 टक्के कमी दराची निविदा प्राप्त झाली. सन 2018-19 च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्वीकृत म्हणजेच 22 कोटी 7 लाख रुपयांची होती. त्यामध्ये रॉयल्टी चार्चेस 10 लाख 35 हजार आणि मटेरियल टेस्टींग चार्चेस 14 लाख 58 हजार असे एकूण 22 कोटी 32 लाख 42 हजार रुपयांमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करुन घेण्यात येणार आहे. ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.