Chikhali : शॉपचा पत्रा उचकटून सुमारे पाच लाखांचे फॅब्रिकेशनचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज- शॉपचा पत्रा उचकटून शॉपमधून तब्बल 4 लाख 95 हजार रुपये किमतीचे लोखंडी (Chikhali) फॅब्रिकेशनचे साहित्य चोरीला गेले आहे. ही घटना सोमवारी (दि.25) रात्री ते मंगळवारी (दि. 26) सकाळी या कालावधीत चिखली येथील टेक्नो क्रेटसोल्युशन नावाच्या फॅब्रिकेशन शॉप येथे घडली आहे.

याप्रकरणी अनिल लक्ष्मण शिंदे (वय 36 रा. भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून (Chikhali) पोलिसांनी अज्ञाता विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Pune : पुणे – नाशिक भुसावळ रेल्वे बंद; प्रवाशांची गैरसोय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या टेक्नो क्रेट सोल्युशन नावाच्या फॅब्रिकेशन शॉपचा लोखंडी पत्रा उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. त्यांनी शॉपमधून 4 लाख 95 हजार 785 रुपयांचे लोखंडी फेब्रिकेशनचे साहित्य चोरून नेले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.