Chikhali News : उद्यानातील कर्मचाऱ्यास बॅटने मारहाण

एमपीसी न्यूज – लहान मुलांना मारहाण करण्यासाठी त्यांच्या मागे धावत असलेल्या सहा मुलांना हटकल्याच्या कारणावरून उद्यानातील कर्मचाऱ्याला सहा जणांनी लाकडी बॅटने मारहाण केली. यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी तीन वाजताच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथील शिवाजी पार्क उद्यान येथे घडली.

भाऊसाहेब दादा थोरात (वय 33, रा. कोयनानगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे संभाजीनगर चिंचवड येथील शिवाजी पार्क उद्यानात नोकरी करतात. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास काही लहान मुले उद्यानातून पळताना फिर्यादी यांना दिसली. त्यामुळे फिर्यादी यांनी लहान मुलांना ‘का पळता’, असे विचारले. ‘आमच्या मागे मोठी मुले लागली आहेत, ती आम्हाला मारतात’, असे लहान मुलांनी सांगितले.

लहान मुलांच्या मागून सहा जण पळत येताना फिर्यादी यांना दिसले. त्यामुळे फिर्यादी यांनी मुलांना ‘का मारता’, असे विचारले. याचा राग आल्याने एकाने फिर्यादी यांना लाकडी बॅटणोने डोक्यात जोरात दोन वेळा मारले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच अन्य आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करून शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक भोये तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.