Chikhali News : महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी कृष्णानगर येथे फेस मशीन उपलब्ध करा – दिनेश यादव

एमपीसीन्यूज : चिखली परिरसरात महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदविण्यासाठी निगडी येथील अ किंवा फ प्रभाग कार्यालयात जावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा बराचसा वेळ वाया जातो. त्यासाठी कृष्णानगर येथील महापालिकेच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी फेस मशीन उपलब्ध करावी, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव  यांनी केली आहे.

फ प्रभाग समितीच्या मासिक बैठकीत यादव यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना हजेरीसाठी होणारा त्रास दूर करण्याचा मुद्दा उपस्थित केला. आज ( गुरुवारी ) ही सभा पार पडली. फ प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

_MPC_DIR_MPU_II

चिखली भागात पाणीपुरवठा, उद्यान आणि आरोग्य विभागात जवळपास 35 कर्मचारी काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना सकाळी आणि संध्याकाळी हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे. मात्र, चिखली भागात महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी फेक मशीनची व्यवस्था नाही.

त्यामुळे या भागात कार्यरत असलेल्या 35 कर्मचाऱ्यांना हजेरीसाठी तीन ते चार किलोमीटर अंतरावरील अ किंवा फ प्रभाग कार्यालयात जावे लागते. दिवसातून दोन वेळा हजेरी द्यावी लागत असल्याने या कर्मचाऱ्यांचा बराचसा वेळ हजेरीसाठी वाया जात आहे. हजेरीसाठी कर्मचाऱ्यांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी कृष्णानगर येथील महापालिका कार्यालयात फेस मशीन उपलब्ध करावी, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी सभेत केली.

या विषयी अधिक माहिती देताना यादव म्हणाले, चिखली ते निगडी हे अंतर खूप लांब आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना दोन वेळा हजेरी लावताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाणीपुरवठा, उद्यान आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमुळे चिखली भागातील अनेक समस्या वेळीच दूर होण्यासाठी मोठी मदत होत आहे. मात्र, दोन वेळच्या हजेरीसाठी त्यांना निगडी येथे जावे लागते. यात त्यांचा दीड ते दोन तासांचा वेळ वाया जातो. त्यासाठी कृष्णानगर येथे फेसमशीन सुरु करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.