Chikhali News: बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – बायोमेडिकल (Chikhali News) वेस्ट उघड्यावर टाकल्याबाबत, प्लास्टिक पिशवीचा वापर आणि डास उत्पती केंद्र तयार केल्याबाबत आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तिघांकडून 47 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Chinchwad : पदाचा गैरवापर करत कंपनीच्या कार्डद्वारे केला 48 लाख 57 हजारांचा अपहार

‘क’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत क्षेत्रिय अधिकारी आण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे, क्षितिज रोकडे, वैभव घोळवे यांच्या पथकाने कारवाई केली. बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकल्याबाबत जाधववाडीतील एका हॉस्पिटलकडून 35 हजार रुपये दंड वसूल केला. बंदी असलेले प्लास्टिक पिशवी (Chikhali News) वापराबाबत 2 आस्थापनास प्रत्येकी 5 हजार रुपयांप्रमाणे एकूण 10 हजार आणि डास उत्पती केंद्र तयार केलेबाबत 1 आस्थापानास 2 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. असा 47 हजार रूपये दंड वसूल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.