Chikhali : इलेक्ट्रिक डीपीवर चढलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू

एमपीसी न्यूज – दारूच्या नशेत महावितणच्या डीपीवर चढलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे दोनच्या सुमारास शेलारवस्ती चिखली येथे घडली.

बाबासाहेब नामदेव भादार्गे (वय 35, रा. शेलारवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब हा दारू पिऊन मंगळवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास शेलारवस्ती येथील महावितरणच्या डीपीवर चढला. त्यावेळी डीपीमधून इलेक्ट्रिक सप्लाय सुरू होता. शॉक लागून बाबासाहेब गंभीररित्या भाजला. त्यास उपचारासाठी वायसीएम रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना पहाटे चार वाजता त्याचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.