Chikhali : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ‘ट्रक’ने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे झाला.

गणेश बंडोपंत आहेर (वय 38, रा. आहेरवाडी, चिखली)  असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नरेश आहेर (वय 47) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बापू दगडू क्षीरसागर (रा. येलवाडी,देहूगाव) या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या ट्र्कने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गणेश यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.