Chikhali : दुचाकी चोरट्यास गुन्हे शाखा ‘युनिट दोन’कडून अटक

एमपीसी न्यूज – दुचाकी चोरट्याच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी चिखली परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

रामस्वरूप बिश्वनाथ तिवारी (वय 45, रा. बाग न्यू कॉलनी मालविनगर चौराह, लखनऊ, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस कर्मचारी नामदेव कापसे आणि शिवानंद स्वामी यांना 27 जानेवारी रोजी माहिती मिळाली की, चिखली परिसरातून दुचाकी चोरणारा एकजण दुचाकीसह चिखली परिसरात येणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी रामस्वरूप याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल जप्त केली. पुढील कारवाईसाठी त्याला चिखली पोलिसांकडे देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.