Chikhali : प्रवासात महिलेचे दागिने व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – प्रवासा दरम्यान महिलेची दागिन्याची व पैशांची पिशवी ( Chikhali)  चोरीला गेली आहे.ही घटना 19 फेब्रुवारी रोजी सांगली ते रुपीनगर असा बस व रिक्षाच्या प्रवासात घडला आहे.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.29 फेब्रुवारी) फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune : किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये विकसनशील भारताचा पाया रचणाऱ्या बदलांवर चर्चासत्राचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या मुलांसह भावाला भेटण्यासाठी सांगली ला गेल्या होत्या. यावेळी त्या बसने पुण्याला व तेथून पुढे रिक्षाने रुपीनगरला आल्या. राहत्या घरी आल्यानंतर फिर्यादीने बॅग उघडली असता बॅगेमधून दागिन्यांची पिशवी दिसली नाही.

त्या बॅगेत 45 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 3 हजार चांदीचे दागिने,10 हजार 500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Chikhali)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.