Chinchwad : शेत जमिनीचा वाद; पठ्ठ्याने मध्यप्रदेशातून आणले पिस्टल

गुन्हे शाखा युनिट दोनने ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – गावामध्ये शेत जमिनीचा वाद (Chinchwad) असल्याने एका पठ्ठ्याने थेट मध्यप्रदेशातून चार पिस्टल आणि दहा काडतुसे आणली. त्यातील दोन पिस्टल त्याने मित्र आणि नातेवाईकाला दिले. दरम्यान पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनने त्या व्यक्तीसह चौघांना अटक केली.

सांगवी परिसरात गस्त घालत असताना सहायक फौजदार शिवानंद स्वामी यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती पीडब्ल्यूडी मैदानाजवळ आला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी हरीष काका भिंगारे (वय 34, रा. औंध रोड आंबेडकरनगर चंद्रमणी संघ पुणे), गणेश बाळासाहेब कोतवाल (वय 30, रा. समर्थनगर, नवी सांगवी) यांना ताब्यात घेतले. दोघांच्या अंगझडतीमध्ये कमरेला लावलेली दोन पिस्टल व पाच जिवंत काडतुसे आढळली.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मागील सहा-सात महीन्यापुर्वी मध्यप्रदेश येथे जाऊन एकूण चार पिस्टल खरेदी करुन (Chinchwad) आणल्याचे व दोन पिस्टल पाषाण पुणे येथील त्यांच्या मित्राला व एक पिस्टल पौड येथील नातेवाईकाला दिल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी पाषाण येथून शुभम जगन्नाथ पोखरकर (वय 30, रा. पाषाण पुणे) व पौड येथून अरविंद अशोक कांबळे (वय 42, रा. पौड, ता. मुळशी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी चार जणांकडून चार पिस्टल व 10 राउंड जप्त केले आहेत.

मध्यप्रदेश येथुन पिस्टल खरेदी करुन आणण्याचा व जवळ बाळगण्याच्या उद्देशाबाबत तपास केला असता असे निष्पन्न झाले की, आरोपी हरीष काका भिंगारे हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरावडे आंबेगाव येथील रहीवाशी असून त्याचा तेथील स्थानिक इसमाशी शेत जमीनीच्या हक्कावरुन वाद आहे. त्याबाबत त्यांच्यात भांडणतंटे झाले होते. हरीष भिंगारे व गणेश कोतवाल हे दोघे मित्र असुन त्यांनी मध्यप्रदेशच्या सिमाभागात जाऊन चार पिस्टल व राउंड खरेदी करुन आणले होते. दोन पिस्टल त्यांनी स्वत:जवळ ठेवून दोन पिस्टल त्यांच्या ओळखीच्या शुभम पोखरकर व अरविंद कांबळे यांचेकडे दिले होते.

Maval : पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा; खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेत मागणी

आरोपींनी ही पिस्टल नेमकी कोणत्या कारणासाठी आणली हे अद्याप समोर आले नाही. गुन्हे शाखा युनिट दोन कडून तपास केला जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, दिलीप चौधरी, उषा दळे, नामदेव कापसे, आतिष कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.