Chinchwad : ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी पाठिंबा द्यावा- हिंदू जनजागृती समितीचे आवाहन

एमपीसी न्यूज -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. या कर्फ्यू ला सर्व नागरिकांनी संपूर्ण पाठिंबा द्यावा असे हिंदू जनजागृती समितीचे आवाहन केले आहे. तसेच समितीच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवारी) कोरोना विषयी वल्लभनगर एसटी बस स्थानक येथे प्रवाशांचे प्रबोधन केले.

पंतप्रधानांनी केलेल्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनास प्रतिसाद देणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रकर्तव्य आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर एसटी बस स्थानक तसेच देशातील अनेक ठिकाणी कार्यकर्ते हातात प्रबोधन फलक घेऊन थांबले होते.

त्याद्वारे नागरिकांना ‘कोरोना’ विषाणूशी लढण्यासाठी शासन आणि त्याच्या संबंधित खात्यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे, तसेच संघटितपणाने या महामारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्नरत रहाण्याचे आवाहन करण्यात आले. प्रबोधनात सहभागी झालेल्या सर्वांनी तोंडाला मास्क लावत, ‘सॅनिटायझर’चा वापर करणे यांसह सरकारने दिलेल्या सर्व उपाय योजनांचे पालन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.