Chinchwad News: महात्मा फुले यांनी समतेची बीजे रोवली – नितीन पवार

एमपीसी न्यूज – महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक  बीजे त्यांनी रोवली.  त्यांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळेच आज विविध  क्षेत्रात आपल्याला न्याय मिळताना दिसतो, असे मत असंघटित कामगारांचे नेते नितीन पवार यांनी व्यक्त केले.

 

कष्टकरी संघर्ष महासंघ, नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज (सोमवारी) चिंचवड येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त कामगार प्रबोधनाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ कामगारांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कामगार नेते काशिनाथ नखाते, स्वराज अभियान महाराष्ट्राचे अध्यक्ष मानव कांबळे, बाराबलुतेदार महासंघाचे प्रताप गुरव, प्रहार पक्षाचे नीरज कडू , प्रदेश संघटक आनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, निरंजन लोखंडे, ओमप्रकाश मोरया, सुखदेव कांबळे,हेमा राठोड, वर्षाराणी  जाधव, कलावती पाल,जमूना दुनघाव,सुमित्रा तुरुकमारे,अलका  हाके, संगीता बहिर आदीसह कामगार  उपस्थित होते.

नितीन पवार म्हणाले, “समाजामध्ये श्रेष्ठांनीं कनिष्ठांची  सेवा करावी हा पायंडा अनेक वर्षांपासून पडलेला आहे.  वास्तविक स्त्री ही अधिक शक्तिशाली व काम करणारी  श्रमिक महिला आहे. मात्र पुरुषांपेक्षा तिला तिच्या कामाला दर्जा कमीच दिला जातो. महिलांना आधी वेतनासह अनेक गोष्टींमध्ये कमी लेखले जाते. राज सत्तेपेक्षा धर्मसत्ता वरिष्ठ मानली जाते हे बदलले पाहिजे. सयाजीराव गायकवाड व राजश्री शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत केली. या मदतीतून बाबासाहेबांनी आदर्श समाज घडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. अनेक मोठमोठ्या संधी असताना सुद्धा बाबासाहेबांनी नोकरी न पत्करता समाजाचे व्रत हाती घेतले”.

समारोप  प्रसंगी कष्टकरी यांनी गीत गायन सादर केले. प्रास्ताविक सुनिता पोतदार  यांनी तर सूत्रसंचालन मधुकर वाघ यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.