Nigdi News : यमुनानगर येथे श्रीराम चौकात फलकाचे अनावरण

एमपीसी न्यूज – दोन वर्षांपूर्वी अयोध्या येथील राम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्या दिवशी यमुनानगर निगडी येथील श्रीराम चौकात साधारण फलक लावला होता. त्याजागी नुकताच नवीन फलक लावून त्याचे अनावरण करण्यात आले. चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. याचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

चौकाचे उदघाटन विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अॅड सतीश गोरडे यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारंग, अनिल अढी, विकास देशपांडे, भाजपाचे दीपक कुलकर्णी, सावरकर मंडळाचे सेक्रेटरी प्रदीप पाटील, डॉ राजीव नगरकर, मुरलीधर सारडा, जगदीश साबळे, अभय खवासखान, पंकज कराड, भाजपचे प्रभाग अध्यक्ष रंगनाथ पवार, अनिल वाणी, बाबा परब, धनाजी मोरे, चंद्रकांत शेडगे, लक्ष्मण शेळके, महिला अध्यक्षा विमल काळभोर, अदिती धुळे, शिल्पा नगरकर, धोकटे काकी आदी उपस्थित होते. श्रीरामरक्षा स्तोत्र पठण, मारुती स्तोत्र, नामाचा जप नागरिकांनी उत्साहात केला.

5 ऑगस्ट 2020 रोजी यमुनानगर येथे श्रीराम चौकाचे साधे नामफलक लावून उदघाटन करण्यात आले होते. दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नामकरणचा ठराव करण्यात आला. रामनवमी निमित्त श्रीराम चौक असा नवीन नामफलक लावण्यात आला. श्रीराम चौकाचे माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या संकल्पनेतून नवीन बांधकाम करण्यात आले. तसेच भिंतीवर आयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराचे तैलचित्र व प्रभू श्रीरामांवर आधारित श्लोक लिहिण्यात आले.

या कामासाठी माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांना भाजप युवा मोर्चा मधील सहकारी गिरीश देशमुख, आदित्य कुलकर्णी, आदित्य चौधरी, योगेश साळुंखे, प्रभू भालचंद्रन, कौस्तुभ देशपांडे, किरण घोटाळे, संकेत चित्ते, सचिन पिंजण यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.