Chinchwad News: संत गाडगेबाबांनी अस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अखंड परिश्रम घेतले – जितेंद्र वाघ

एमपीसी न्यूज – संत गाडगेबाबा यांची किर्तने म्हणजे लोकप्रबोधनाची (Chinchwad News) माध्यमे असत, भजन किर्तनाच्या माध्यमातून अज्ञान, अस्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अखंड परिश्रम घेणारे मानवतावादी संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त वाघ आणि उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Pune RTO : मालवाहतूक, टुरीस्ट टॅक्सीसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

यावेळी जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संतोष भालेकर ,सागर पवार, संतोष जोगदंड, भाई विशाल जाधव, संतोष कदम, पोर्णिमा कदम, दिपा भालेकर, कल्पना गायकवाड, अशोक हिंगे पाटील, बबन वडमारे, बाळाजी जगतकर, ज्ञानेश्वर कवंठेकर, निखील दळवी आदी उपस्थित होते.

संत गाडगेबाबांनी अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी (Chinchwad News) धर्मशाळा, अनाथालये, विद्यालये सुरु केली. त्यांच्या नावाने शासन स्तरावर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान देखील सुरु आहे. संत गाडगेबाबा यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.