Chinchwad : ट्रॅव्हल्स बसवाल्यासांठी शहरात पाच ठिकाणी ‘पिकअप पाॅईंट’;वाहतुकीला अडथळा केल्यास दंड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी ट्रॅव्हल्स बसवाल्यासांठी ( Chinchwad) शहरात पाच पिकअप पाॅईंट निश्चित केले आहेत. त्याव्यतिरिक्त शहरात प्रवाशांच्या ‘पिकअप’ आणि ड्राॅपसाठी कुठेही बस थांबवून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त बांगर यांनी दिले आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतानाच पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी खासगी ट्रॅव्हल्स बसवाल्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे.

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे ही आयटी पार्क क्षेत्रे आहेत. तसेच देहू व आळंदी ही संतांची भुमी आहे. शहरात पिंपरी बाजारपेठ सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्याअनुषंगाने राज्यातील तसेच देशातील नागरिक उदरनिर्वाहाकरीता पिंपरी -चिंचवड आयुक्तालय हद्दीत स्थायिक झाल्याने शहराचा विकास तसेच वाढ वेगाने होत आहे. नागरिक आपल्या गावी ये-जा करण्यासाठी प्रामुख्याने लक्झरी ट्रॅव्हल्स बसचा पर्याय निवडतात. लक्झरी ट्रॅव्हल्स बस या निगडी, तळवडे, भोसरी हद्दीतून महाराष्ट्रात तसेच देशाचे विविध राज्यात येतात व जातात.

Punawale : कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी पुनावळे येथे घंटानाद आंदोलन

पिंपरी – चिंचचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील निगडी, तळवडे व भोसरी येथून ( Chinchwad) लक्झरी ट्रॅव्हल्स बस ये-जा करत असताना या मार्गातील मधुकर पवळे उड्डाणपूल, खंडोबा माळ, चिंचवड, बिजली नगर, चिंतामणी चौक, अहिंसा चौक, चापेकर चौक, थेरगाव, बिर्ला हॉस्पिटल, डांगे चौक, काळेवाडी, नाशिक फाटा, फुगेवाडी तसेच इतर कोणत्याही ठिकाणी प्रवासी घेण्यासाठी थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच अपघातांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे.

वाहतूक पोलिसांनी ठरवून दिलेले ‘पिकअप पाॅईंट’

निगडी येथील भक्‍ती शक्‍ती सर्कल तसेच तळवडे येथील टॉवर लाईन व रुपीनगर तसेच भोसरी येथील गावजत्रा मैदान व लांडेवाडी येथील बाबर पेट्रोलपंप हे लक्झरी ट्रॅव्हल्स बससाठी पिक अप व ड्रॉप पॉईंट पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून निश्चित केले आहेत. त्याव्यतिरिक्त लक्झरी ट्रॅव्हल्स बस कुठेही थांबल्यास बसवर संबंधित वाहतूक विभागांकडून कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ट्रॅव्हल्स बस चालक, मालक तसेच बुकिंग घेणारे एजंट यांनी नोंद घ्यावी, असे उपायुक्त बांगर यांनी आदेशात नमूद केले आहे.

नागरिकांनीही गैरसोय टाळण्यासाठी निगडी येथील भक्‍ती शक्‍ती सर्कल, तळवडे येथील टॉवर लाईन, रुपीनगर, भोसरी येथील गावजत्रा मैदान व लांडेवाडी येथील बाबर पेट्रोलपंप या ठिकाणांवरूनच प्रवास सुरू करावा, असे आवाहन पिंपरी -चिचवड वाहतूक शाखेतर्फे करण्यात ( Chinchwad) आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.