Chinchwad : स्वच्छ प्लस या सहकारी संस्थेच्या ऑफिसमध्ये 1 लाख रुपयांची चोरी

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील स्वच्छ प्लस या सहकारी संस्थेच्या (Chinchwad)ऑफिसमधून चोरांनी टीव्ही , पितळ व तांब्याची भांडी व रोख रक्कम असा एकूण एक लाख 7 हजार रुपयांची चोरी केली आहे. ही चोरी शनिवारी (दि.16) रविवार (दि.17) या कालावधीत घडली.

याप्रकरणी नितीन नरहरी काळे (वय 29 रा भोसरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून चिंचवड पोलिसांनी अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

PCMC : नोकर भरतीतील पात्र उमेदवारांना रुजू करून घेण्यास दिरंगाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे (Chinchwad)चिंचवड केशवनगर येथे स्वच्छ प्लस पुणे सेवा सहकारी संस्था आहे. या संस्थेच्या ऑफिसमधून चोरांनी टीव्ही, दोन लॅपटॉप पितळेची व तांब्याची भांडी, इंटरनेट राउटर, रोख 50 हजार रुपये असा एकूण 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.