Mpc News Impact : ‘एमपीसी न्यूज’च्या बातमीनंतर माथाडी कार्यालयाच्या इमारत परिसरात पालिकेकडून स्वच्छता 

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील माथाडी कामगार कार्यालयाच्या इमारत परिसरात कचरा, अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली असल्याचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने मंगळवारी (दि.4) प्रसारित केले. त्यानंतर पिंपरी चिंचवड मनपा सफाई कर्मचाऱ्यांनी माथाडी कार्यालयाच्या इमारत परिसराची स्वच्छता केली आहे. 

चिंचवड मालधक्का जवळ गुलनूर इमारतीत माथाडी व शॉप ॲक्ट’चे कार्यालय आहे. इमारतीच्या खाली मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त कचरा साठला आहे. जागा मिळेल तिथे लघुशंका आणि शौच केल्याने परिसरात किळसवाणी दुर्गंधी पसरली आहे. तसेच, कार्यालय इमारत दारुचा अड्डा झाला असून, दारुच्या बाटल्या आणि सिगारेट, बिडीची थोटके ठिक ठिकाणी पडल्याचे ‘एमपीसी न्यूज’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. त्यानंतर यासंबंधीचे वृत्त मंगळवारी (दि.4) प्रसारित केले.

वृत्ताची दखल घेऊन त्याच दिवशी (मंगळवारी) पालिकेच्या वतीने माथाडी कार्यालयाच्या इमारत परिसराची स्वच्छता करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा, प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला आहे. पालिकेकडून स्वच्छता केल्यानंतर माथाडी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी ‘एमपीसी न्यूज’चे आभार मानले आहेत.

दरम्यान, जुन्या इमारतीत असलेल्या माथाडी व शॉप ॲक्ट’ कार्यालयाची दुरावस्था झाली आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून या इमारतीत ही दोन कार्यालय आहेत. इमारतीत मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आणि मोडकळीस आलेले साहित्य आहे. अपुरा सूर्यप्रकाश आणि वीज नसल्याने इमारतीत अंधार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे अथवा सुरक्षा रक्षक नसल्याने ही इमारतात काही शौकीनांसाठी ‘आयो जाओ घर तुम्हारा’ झाली आहे.

‘एमपीसी न्यूज’ने प्रसिद्ध केलेली मूळ बातमी

Chinchwad News : माथाडी कामगार कार्यालयाची इमारत घाणीच्या विळख्यात ; सभोवताली दुर्गंधी, कार्यालयाची दुरावस्था

Chinchwad News : माथाडी कामगार कार्यालयाची इमारत घाणीच्या विळख्यात ; सभोवताली दुर्गंधी, कार्यालयाची दुरावस्था

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.