Shriranga Barne : सहकारी संस्था कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभ्या राहतात – खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज  – पुण्यनगरी ही अशी जागा आहे जिथे कोणीही उपाशी झोपले नाही. या शहाराने कोणाला तसे झोपूही दिले नाही. मी इथला भूमीपुत्र आहे. इथल्या कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठीअर्थ सहाय्य करण्यासाठी  सहकारी संस्था उपयोगी पडतातअसे मत खासदार श्रीरंग बारणे (Shriranga Barne) यांनी शुक्रवारी (दि.26) गुरुकृपा मल्टिपर्पज (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते फित कापून हे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिव व्याख्याते नामदेवराव जाधवअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसलेगुरुकृपा मल्टिपर्पज (मल्टिस्टेट) को -ऑपरेटीव्ह सोसायटीच्या चेअरमन श्रावणी संतोष चव्हाण आणि एस स्क्वेअर एंटरटेनमेंट आणि सर्वज्ञ नाट्य संस्थेचे अध्यक्ष संतोष चव्हाणसहकार आयुक्त पुणे अनिल कवडे,  पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदेआमदार सुनील शेळकेआमदार महेश लांडगेआमदार अण्णा बनसोडेमाजी नगरसेवक शंकर जगतापमाजी नगरसेविका सुमन पवळेमाजी नगरसेवक सचिन चिखलेमाजी नगरसेविका पौर्णिमा सोनवणेमाजी नगरसेवक प्रवीण भालेकरमाजी नगरसेविका संगीता ताम्हाणेमाजी नगरसेवक पंकज भालेकरशांताराम द. भालेकरशांताराम को. भालेकर आदी उपस्थित होते.

KTES School : ‘केटीईएस’मध्ये पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी गुजराथी, उपाध्यक्षपदी भोगाडे बिनविरोध

खासदार श्रीरंग बारणे म्हणालेसर्व सामान्य नागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी शहराच्या विविध भागात अशा प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत. गरजू व्यक्तींना कर्जाच्या माध्यमातून मदत करत असतात. संतोष चव्हाण यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. भूमीपुत्र या नात्याने जी काही मदत लागेल ती मी (Shriranga Barne) करण्यास तयार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.