Corona Update : देशात एका दिवसात सर्वाधिक 51 हजार 706 रुग्ण बरे होण्याचा विक्रम; 67.19 टक्के रुग्ण कोरोनमुक्त

रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा दुप्पट झाली आहे. ; The highest number of 51,706 patients cured in a single day in the country; 67.19 percent of patients are coronary free

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात एका दिवसात सर्वाधिक 51 हजार 706 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर विक्रमी 67.19 टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत एकूण 12 लाख 82 हजार 215 रुग्ण बरे झाले असून ही संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा दुप्पट आहे.

रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत असल्यामुळे गेल्या 14 दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 63.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

केंद्राच्या “टेस्ट, ट्रॅक, ट्रिट” नीतीद्वारे सुरू असलेले कोविड – 19 प्रतिसाद आणि व्यवस्थापन यामुळे ही अपेक्षित सुधारणा दिसून येत आहे.

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांच्या एकत्रित प्रयत्नांनी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांसह नमुन्यांची वाढती चाचणी यामुळे गेल्या 14 दिवसात रुग्ण बरे होण्याचा दर 63 टक्क्यांवरून 67 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सतत वाढ होत असल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत 7 लाख इतकी झाली आहे.

दररोज जास्तीत जास्त रुग्ण बरे होत असल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 5,86,244 (काल ही संख्या 5,86,298 इतकी होती) इतकी झाली असून हे रुग्ण वैद्यकीय उपचार घेत आहेत.

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या “टेस्ट, ट्रॅक, ट्रिट” धोरणाची एकत्रित अंमलबजावणी केल्याने सीएफआर अर्थात कोविड मृत्यू दर जागतिक परिस्थितीच्या तुलनेत कमी असून त्यात सातत्याने घट होत आहे. कोविड मृत्यू दर आज 2.09 टक्के इतका आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.