New Delhi : केरळमध्ये कोरोना लस मोफत दिली जाणार

एमपीसी न्यूज : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. कोरोना विषाणूची लस राज्यातील लोकांना विनाशुल्क दिली जाणार आहे. अनेक लसी उत्पादकांनी लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारने कोणत्याही लसीला ग्रीन सिग्नल दिला नाही.

देशात कोरोनाचे ९३.२४ लाख लोक बरे झाले असून, त्याचे प्रमाण ९४.८८ टक्के झाले आहे. या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ९८.२६ लाखांवर पोहोचली असून, सक्रिय रुग्णांचा आकडा साडेतीन लाख आहे. नव्या रुग्णांची संख्याही कमी असून, मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे. देशातील कोरोना महामारीचे संकट मंदावल्याने आणि लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्याने लवकरच भारतीयांना लसीचा डोस देण्यासंदर्भात गतीमान हालचाली सुरू आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, केरळमधील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, अशी घोषणा विजयन यांनी केली. आत्तापर्यंत भाजपाशासित मध्य प्रदेश आणि बिहार राज्यात कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे, मोफत लस देणारे केरळ हे तिसरे राज्य असणार आहे. तर, भाजपा शासनव्यतिरिक्त राज्यात कोरोना लसीची घोषणा करणारे केरळ हे पहिलेच राज्य ठरले आहे.

केरळमध्ये शनिवारी 5,949 रुग्ण आढळून आले आहेत, तर 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 6.64 लाख एवढी झाली असून आत्तापर्यत 2594 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही मुख्यमंत्री विजयन यांनी दिली. तसेच, लसीकरण हा महत्त्वाचा मुद्दा असून लोकांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे, लसीकरण मोहिम राबविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचंही विजयन यांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.