Corona World Update: तब्बल 30 लाख रुग्णांची कोरोनावर मात तर अजूनही 30 लाख सक्रिय कोरोना रुग्ण

Corona World Update: As many as 30 lakh patients overcome corona while 30 lakh still active corona patients

एमपीसी न्यूज – जगातील तब्बल 30 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून तेवढेच म्हणजे सुमारे 30 लाखांहून अधिक सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्तांची टक्केवारी 46.89 टक्क्यांपर्यंत वाढल्याने आता जगातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 47.18 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, या बाबी दिलासा देणाऱ्या आहेत. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 64 लाख 47 हजार 901 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 82 हजार 412 (5.93 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 30 लाख 23 हजार 638 (46.89 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 30 लाख 41 हजार 851 (47.18 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 29 लाख 87 हजार 323 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 54,528 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

27 मे – नवे रुग्ण 1 लाख 06 हजार 475, दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 283

28 मे – नवे रुग्ण 1 लाख 16 हजार 304, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 612

29 मे – नवे रुग्ण 1 लाख 25 हजार 511, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 872

30 मे – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 102, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 084

31 मे – नवे रुग्ण 1 लाख 08 हजार 767, दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 191

1 जून – नवे रुग्ण 1 लाख 03 हजार 050, दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 017

2 जून – नवे रुग्ण 1 लाख 15 हजार 215  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 669


अमेरिकेत 6.46 लाखांपेक्षा अधिक कोरोना मुक्त
,

अमेरिकेत मंगळवारी 1,134 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 08 हजार 059 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 18 लाख 81 हजार 205 झाली आहे तर 6 लाख 45 हजार 974 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

ब्राझीलने ओलांडला कोरोना बळींचा 31 हजारांचा टप्पा

ब्राझीलमध्ये मंगळवारी 1,232 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 31 हजार 278 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 56 हजार 668 झाली आहे तर 2 लाख 40 हजार 627 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

इंग्लंडमध्ये काल (मंगळवारी) 342, भारतात 221, रशियात 182, पेरूमध्ये 133 तर फ्रान्समध्ये 107 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. पाकिस्तानमध्ये 78, चिलीमध्ये 75, कॅनडा 69, स्वीडन 65, इराण 64, जर्मनी 56, इटली 55 तर दक्षिण अफ्रिकेत 50 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 1,881,205 (+21,882), मृत 108,059 (+1,134)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 556,668 (+27,263), मृत 31,278 (+1,232)
  3. रशिया – कोरोनाबाधित 423,741 (+8,863), मृत 5,037 (+182)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 287,012 (+294), मृत 27,127 (NA)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 277,985 (+1,653), मृत 39,369 (+324)
  6. इटली – कोरोनाबाधित 233,515 (+318), मृत 33,530 (+55)
  7. भारत – कोरोनाबाधित 207,191 (+8,821) , मृत 5,829 (+221)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 184,091 (+326), मृत 8,674 (+56)
  9. पेरू –  कोरोनाबाधित 174,884 (+4,845) , मृत 4,767 (+133)
  10. टर्की – कोरोनाबाधित 165,555 (+786), मृत 4,585 (+22)
  11. इराण – कोरोनाबाधित 157,562 (+3,117), मृत 7,942 (+64)
  12. फ्रान्स – कोरोनाबाधित 151,325 (+NA), मृत 28,940 (+107)
  13. चिली – कोरोनाबाधित 108,686 (+3,527), मृत 1,188 (+75)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 93,435 (+2,771), मृत 10,167 (+237)
  15. कॅनडा –  कोरोनाबाधित 92,410 (+705), मृत 7,395 (+69)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 89,011 (+1,869) मृत 549 (+24)
  17. चीन – कोरोनाबाधित 83,021 (+4), मृत 4,634 (+NA)
  18. पाकिस्तान – कोरोनाबाधित 76,398 (+3,938), मृत 1,621 (+78)
  19. कतार – कोरोनाबाधित 60,259 (+1,826), मृत 43 (+3)
  20. बेल्जियम – कोरोनाबाधित 58,615 (+98), मृत 9,505 (+19)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.