Pune : नगरसेवकांनी जिमचे साहित्य खरेदीकडे लक्ष देण्यापेक्षा शाळेच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या -महापौर मुक्ता टिळक

एमपीसी न्यूज -पुणे शहरातील प्रत्येक नगरसेवकांनी चांगल्या शाळा चालण्याच्या दृष्टीने जिमचे साहित्य खरेदीकडे लक्ष देण्यापेक्षा शाळेच्या गुणवत्तेकडे आणि विद्यार्थ्यांच्या साहित्य खरेदीकडे लक्ष द्या, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्य सभेत नगरसेवकांना केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अनेक नगरसेवकांनी शाळांबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर खूप काळ चर्चा देखील झाली. त्या दरम्यान महापौर मुक्ता टिळक यांनी जिमचे साहित्य खरेदीकडे लक्ष देण्यापेक्षा शाळेच्या गुणवत्तेकडे आणि विद्यार्थ्यांच्या साहित्य खरेदीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.