Pune News : महापालिकेचे कामकाज  50 टक्के कर्मचार्‍यांवरच तब्बल साडेसात हजार पदे रिक्त

एमपीसी न्यूज – पुणे  महापालिकेमध्ये वर्ग 1 पासून वर्ग 4 पर्यंत गेल्या अनेक वर्षापासून भरती झालेली नाही. त्यामुळे सेवा नियमावली मान्य होवून सुध्दा तब्बल 7 हजार 703 जागा महापालिकेत रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे महापालिका 50 टक्के कर्मचार्‍यांवरच सुरु आहे. कंत्राटी कामगार आणि राज्य सरकारकडून आलेल्या अधिकारी यांच्यावर महापालिकेचा कारभार सुरु आहे.

राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महापालिका पुणे आहे. नुकतीच महापालिकेच्या हद्दीमध्ये तेवीस गावांचा समावेश झाल्यामुळे मोठी हद्दवाढ झाली आहे. एवढ्या मोठ्या महापालिकेचा डोलारा चालवायचा असल्यास पुर्ण कर्मचारी वर्ग आवश्यक आहे. महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगारांची भरती गेल्या अनेक वर्षापासून झालेले नाही. कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढून झाडण काम केले जाते. त्यामुळे कायमस्वरुपी पदा भरण्याकडे कायमच दुर्लक्ष करण्यात येत आहे.
पुण्याची लोकसंख्या 50 लाखांपर्यंत पोहचत आहे. असे असताना स्मार्ट सिटी असलेल्या पुण्यात महापालिकेच्या सेवा योग्य पध्दतीने मिळणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षापासून अपुर्‍या कर्मचार्‍यांवर महापालिकेचा गाडा सुरु आहे.

सेवा नियमावलीनुसार महापालिकेत वर्ग 1ची 146 पदे मंजूर आहेत. यापैकी 40 पदे भरण्यात आली आहेत. 106 पदे रिक्त आहेत. वर्ग 2 ची 373 पदे मंजूर असून 173 पदे भरण्यात आली आहेत. यामधील 200 पदे रिक्त आहेत. वर्ग तीनची 4 हजार 824 पदे मंजूर आहेत. यापैकी 2 हजार 810 पदे भरण्यात आली असून 2 हजार 14 पदे रिक्त आहेत. वर्ग 4 ची 6 हजार 21 पदे मंजूर आहेत यापैकी 3 हजार 562 पदे भरण्यात आली आहेत. 2 हजार 459 पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिका 50 टक्के कर्मचार्‍यांवरच सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.