Shaunagar News : पाणीपुरवठा सुरळीत करा; भाजप महिला पदाधिकाऱ्यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – चिंचवड, शाहूनगर मधील पाणी पुरवठा त्वरित सुरळीत करावा अशी मागणी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली.

माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, भाजपा उपाध्यक्ष सुप्रियाताई चांदगुडे, भाजपा मंडळ अध्यक्ष दीपाली करंजकर, स्वाती शहाणे, योगिता पाटील, मनिषा काशीद, कुसुम शर्मा यांनी आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.

त्यात म्हटले आहे की, शाहूनगर परिसरात गेल्या महिन्यापासून पाणी पुरवठा अत्यंत विस्कळीत आहे. अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा ताबडतोब सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.