Moshi news: कोविड योद्ध्या 50 शिक्षकांचा गौरव

निलेश बोराटे यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – कोरोना काळात प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांनी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत मोशी परिसरातील 50 शिक्षकांचा गौरव केला. कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेत गौरव केल्याने शिक्षक भारावून गेले होते. शहरातील व पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच कार्यक्रम होता.

या कार्यक्रमासाठी माजी महापौर राहुल जाधव, अतुल बोराटे, निलेश तळेकर, वैभव बोराटे, प्रा. राजेश सस्ते, पूजा आल्हाट, गीता महेंद्रु, राजश्री जायभाय, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष विजया आल्हाट उपस्थित होते.

निलेश बोराटे म्हणाले, कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून ते आजतागायत समाजातील सर्व घटक योध्दा बनून काम करत आहेत. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी व शिक्षक आहेत. पण, सर्वाबरोबर काम करून जरासा दुर्लक्षित राहिलेला  घटक म्हणजे शिक्षक होता. अनेक शिक्षक ऑनलाईन ऑफलाईन अभ्यासक्रम घेऊन कोविड 19 जबाबदारी सांभाळत होते. यांचाही सन्मान व्हावा या भावनेने आमदार महेश लांडगे व माजी महापौर राहुल जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांसाठी कोविड योध्दा सन्मान घेण्यात आला.

मोशी परिसरातील 50 शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले.  शहरातील व पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच कार्यक्रम होता. दरम्यान, निलेश बोराटे यांच्या वतीने लॉकडाऊनमध्ये अनेक गरजूंना अन्य धान्य वाटप देखील करण्यात आले होते.

अनेक शिक्षकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.  त्यामध्ये भाऊसाहेब पांडे, शीतल अभंग, वैशाली मानकर बोटकरसर, कळसकर यांनी शिक्षकांची समाजाने दखल घेऊन गौरवल्याबद्दल निलेशभाऊ बोराटे मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व संचालन विनोद बोराटे यांनी केले. उपस्थितांचे आभार नीलेश बोराटे व सुजाता बोराटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.