Credit Card Fraud : क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेतून बोलत असून क्रेडिट कार्डची (Credit Card Fraud) लिमिट वाढवून देतो म्हणत बँक खात्यातून थेट एक लाख 10 हजार रुपये काढून घेण्यात आले. हा प्रकार 7 सप्टेंबर रोजी दुपारी मस्करनीस कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

आनंद गहिनीनाथ लोंढे (वय 35, रा. मस्करनीस कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8273295126 या क्रमांकावरून बोलणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Baba Kamble : देशव्यापी संघटन उभारून टॅक्सी, रिक्षा, वाहतुकदारांचे प्रश्न सोडवू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोंढे यांना आरोपीने (Credit Card Fraud) फोन केला. तो आरबीएल बँकेतून बोलत असून लोंढे यांच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून आली आहे, असे सांगत लोंढे यांच्या क्रेडिट कार्डशी संबंधित काही माहिती देखील आरोपीने सांगितले. त्यामुळे लोंढे यांना फोनवरील व्यक्ती बँकेतूनच बोलत असल्याचा विश्वास बसला. लोंढे यांनी आरोपीसोबत ओटीपी आणि सीव्हीव्ही नंबर शेअर केला. त्यानंतर लोंढे यांच्या खात्यातून एक लाख 10 हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.