Cricket : वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी, कोहिनूर ग्रुप इलेव्हन संघ विजयी

एमपीसी न्यूज – थेरगाव येथे सुरु असलेल्या U19 वुमेन्स व्हेरॉक (Cricket )कप 2023 स्पर्धेत वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी, कोहिनूर ग्रुप इलेव्हन संघांनी आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. या दोन सामन्यात अनन्या चव्हाण, क्रिशी ठक्कर या सामना वीरांगना ठरल्या आहेत.

वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध ए.के स्पोर्ट्स (Cricket)अकॅडमी या संघात झालेल्या सामन्यात वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीने विजय मिळवला आहे.

वारीयर्स क्रिकेट अकादमीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 190 धावांचे लक्ष्य उभे केले. श्रद्धा गिरमे 74 धावा आणि नीधी शांभवाणी 54 धावा यांनी अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात ए के स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ 83 धावांत आटोपला.

Congress : कॉंग्रेसची कार्यकारिणी जाहीर; ‘यांची’ लागली वर्णी

प्रांजली पिसे या फलंदाजाने 44 धावांची एकाकी झुंज दिली. या सामन्यात 4 बळी मिळवणारी वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीची अनन्या चव्हाण सामना वीरांगना ठरली.

 

कोहिनूर ग्रुप इलेव्हन विरुद्ध किंग्स स्पोर्ट्स क्लब संघांदरम्यान झालेल्या लढतीत कोहिनूर ग्रुप इलेव्हनसंघाने 7 विकेट शिल्लक ठेऊन बाजी मारली.

प्रथम फलंदाजी करताना किंग्स स्पोर्ट्सच्या संघाने 125 धावा केल्या. यामध्ये अनिशा 49 धावा आणि रिशिका 43 धावांचे योगदान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहिनूरच्या संघाने 21 व्या षटकात लक्ष्य पार केले. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारी क्रीशी टक्कर सामना वीरांगना ठरली. तिने गोलंदाजीत 5 बळी मिळवत फलंदाजीत 29 धावांचे योगदान दिले. तसेच प्रतिभाने 59 धावांची अर्धशतकी खेळी साकारली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.