Dapodi News : ‘ऑल सोल्स डे’ निमित्त ख्रिचन बांधवांकडून पूर्वजांचे स्मरण

एमपीसी न्यूज – ख्रिश्चन भाविकांमध्ये 02 नोव्हेंबर हा दिवस ‘ऑल सोल्स डे’ म्हणजे मृतांचा स्मरणदिन म्हणून पाळला जातो. आज ‘ऑल सोल्स डे’ निमित्त ख्रिचन बांधवांकडून पूर्वजांचे स्मरण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले.

दापोडी येथील ख्रिचन दफनभूमीत ख्रिचन बांधवांनी आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी आप्तेष्टांच्या कबरीवर फुले, हार अर्पण करून अगरबत्ती व मेणबत्ती लावत अभिवादन केले. मेणबत्तीच्या उजेडात दफनभूमीचा परिसर प्रकाशमय झाला होता. नातेवाईकांनी आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तींच्या आठवणींना उजाळा दिला व मृत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली.

दफनभूमी बाहेर फुले, हार, अगरबत्ती आणि मेणबत्ती विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. ‘ऑल सोल्स डे’ या दिवशी मृत आत्मा आपल्याला भेटायला येतात, असा ख्रिश्चन लोकांचा विश्वास आहे. मृत लोकांच्या आठवणीत गोड पदार्थ, व इतर खाद्यपदार्थ तयार करून त्यांना नैवेद्य म्हणून ठेवले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.