Pimpri News : पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या अध्यक्षपदी दत्तात्रय देशमुख, सचिवपदी सुधीर देशमुख यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या अध्यक्षपदी दत्तात्रय देशमुख आणि सचिवपदी सुधीर देशमुख, खजिनदार पदी डॉ. वैशाली गोरडे यांची निवड करण्यात आली आहे. फेडरेशनच्या पदाधिका-यांची पाच वर्षांसाठी निवड केली जाते. मात्र ही निवडणूक मध्यावधी झाल्याने दत्तात्रय देशमुख आणि सुधीर देशमुख यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड झाली आहे.

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची स्थापना सन 2017 साली झाली. पिंपरी चिंचवड शहरातील 100 हाऊसिंग सोसायट्या सध्या या फेडरेशनचा भाग आहेत. तर शहरात नोंदणीकृत असलेल्या सुमारे तीन हजार सोसायट्या पुढील काळात पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा भाग होतील, असा विश्वास सचिव सुधीर देशमुख यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह सोसायटी कायद्यानुसार या फेडरेशनचिस स्थापना झाली असून हे फेडरेशन तीन स्तरावर काम करत आहे. सोसायट्यांमध्ये समन्वय राखणे. सोसायटी आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका यांच्याशी समन्वय राखून विविध विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे, त्याची अंमलबजावणी करून घेणे, त्याचा पाठपुरावा करणे. तसेच सोसायट्याशी संबंधित कायद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी राज्याला मदत करणे. राज्य स्तरावर सोसायट्यांचे प्रश्न मांडणे अशा तीन स्तरावर हे फेडरेशन काम करत आहे.

सर्वसमावेशक उद्दिष्टांना घेऊन फेडरेशन काम करेल. फेडरेशनचा कारभार कुठल्याही राजकीय दबावाखाली अथवा व्यक्तीनिष्ठ विचाराच्या आहारी जाऊन केला जाणार नाही. सामाजिक बांधिलकी जपून फेडरेशन काम करेल, असा विश्वास नवनियुक्त पदाधिका-यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.