Urse News : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांवर दरोडा, पाच जणांना अटक 

एमपीसी न्यूज – पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांवर दरोडा लुटले, याप्रकरणी पाच जणांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. एक्सप्रेस वेवरील उर्से गावच्या हद्दीत असलेल्या फुड मॉलच्या विरुद्ध दिशेला सोमवारी (दि.11) ही घटना घडली. दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवून चालक व त्याच्या भावाला लुटले.  

आदर्श अनिल चौधरी (वय 19, रा. वर्सोली, लोणावळा), अजय गुलाब साळुंखे (वय 19, रा. दत्तवाडी, मुळशी), संजय मारुती चव्हाण (वय 22, रा. समतानगर, लोणावळा), गणेश राजु काळे (वय 22, रा. वडगाव, मावळ) आणि अमृत रवी जाधव (रा. दत्तवाडी, मुळशी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी चालक जमाल कमल खान (वय 27, रा. उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस (शिरगाव चौकी) येथे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चालक व त्यांचा भाऊ हे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरुन जात होते. उर्से गावच्या हद्दीत असलेल्या फुड मॉलच्या विरुद्ध दिशेला आपला ट्रक (MH 04 GC 3975) थांबवून लघुशंकेसाठी उभे राहिले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्याच्या भावाला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम असा 19 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.