DCM Ajit Pawar : यंदाच्या पालखी सोहळ्यात पंधरा लाख भाविक, अजित पवार यांनी दिली सविस्तर माहिती

एमपीसी न्यूज – मागील दोन वर्षे कोरोनामुळे होऊ न शकलेला आषाढी वारी सोहळा यंदा निर्बंधमुक्त असणार आहे. दोन वर्षांपासून वारीत खंड पडल्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात तब्बल पंधरा लाख भाविक पंढरपुरात जमतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत रविवारी पुण्यातील कौन्सिल हॉल येथे वारीच्या नियोजनाबाबत एक बैठक पार पडली. या बैठकीला सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आळंदी देहू आणि पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष उपस्थित होते.

Hunger Strike Against RFD : पुण्यातील नद्या वाचविण्यासाठी साखळी उपोषणाचे 100 दिवस पूर्ण

पत्रकार परिषदेनंतर बोलताना अजित पवार (DCM Ajit Pawar) म्हणाले, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांच्या प्रस्थानचे नियोजन करण्यात आले आहे. वारीची सर्व तयारी सुद्धा झाली आहे. यापूर्वी दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे निर्बंध होते, त्यामुळे पालखी सोहळा होऊ शकला नाही. मात्र यंदा कोणतेही निर्बंध नाही त्यामुळे पालखी सोहळ्यात जवळपास पंधरा लाख भाविक जमतील. यावेळी पालखी मार्गावर कोण कोणत्या सोयी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याची माहिती सु्द्धा अजित पवार यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.