Environment Day 2022 : जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण व जनजागृती करून साजरा

एमपीसी न्यूज – 5 जून ‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त (Environment Day 2022) नारायण हट शिक्षण संस्था, नारायण हट गृह संस्था, भूगोल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 100 देशी, आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करून वृक्षांच्या संगोपनासाठी दत्तक वृक्ष (वृक्षसंवर्धन पालकत्व ) योजना राबवण्यात आली. पर्यावरण -हासाचे परिणाम संपूर्ण जग अनुभवत असून त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे म्हणून झाडे लावणे व झाडे जगवणे पर्यावरण संरक्षणासाठी गरजेचे झाले आहे असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. 

काल (दि. 5 जून) सकाळी ‘जागतिक पर्यावरण दिनाचे ‘ (Environment Day 2022) औचित्य साधून 100 देशी, आर्युर्वेदिक वृक्षांची भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळा क्रीडांगण परिसरात लागवड करण्यात आली. नारायण हट शिक्षण संस्था, भूगोल फाउंडेशन, नारायण हट सहकारी गृह संस्था, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

State Excise Department Action : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावर पकडले गोव्यातील दारूने भरलेले दोन कंटेनर

दरम्यान, लागवड केलेल्या वृक्षांमध्ये फळझाडे, आयुर्वेदिक झाडे, पर्यावरण पूरक झाडांची लागवड करण्यात आली असून वड, पिंपळ, चिंच, उंबर, आंबा, फणस, पेरू, जांभूळ, सोनचाफा, अडुळसा,बकुळ,रामफळ,कदंब,बेल, नारळ, कवट, सिताफळ, बोर, अर्जुन, बहावा,कडूनिंब,या जातीच्या झाडांना प्राधान्य देण्यात आले आहे.

केवळ झाडे लावून उपयोग नाही त्यांचे संगोपन पर्यावरणाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे, असे महत्त्व सांगून या उपक्रमावेळी दत्तक वृक्ष(वृक्षसंवर्धन पालकत्व) ही संकल्पना स्वीकारण्यात आली. त्यानुसार शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पालकांनी झाडांचे संगोपन व सोसायटीतील सभासदांनी झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली. यामध्ये प्रत्येकाने स्वतः लागवड केलेल्या एक झाडाचे संगोपन वर्षभर करून त्यांचा पुढील वर्षी वाढदिवस साजरा करण्याचे यानिमित्ताने ठरले.

याप्रसंगी भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज यांनी वृक्षांची मानव,पर्यावरण व अै्ाषधी उपयोग, पर्यावरण संवर्धन करण्याची जबाबदारी सामूहिक आहे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सोसायटीचे सभासद, संचालक, शिक्षण संस्थेचे संचालक, भूगोल फाऊंडेशनचे सभासद, शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक लोकांनी सुद्धा या वृक्ष लागवडी मध्ये सहभाग घेतला.

वृक्षलागवड कार्यक्रमाचे संयोजन अंकुशराव गोरडे, रोहिदास गैंद, शिवराम काळे, डॉ. वसंतराव गावडे, डॉ‌. बाळासाहेब माशेरे, विठ्ठल वाळुंज साहेब, साहेबराव गावडे, कर्नल तानाजी अरबुज, अनिल घाडगे, राजेंद्र ठाकूर, मनोज माकोडे,  शशिकांत वाडते, अनिल पोवार,  अजिंक्य पोटे, ज्योतीताई दरंदले, शोभाताई फटांगडे, शीलाताई इचके, मीनाताई आखाडे, ज्ञानेश्वर सावंत, यशवंत नेहरे, डॉ. सुरेश पवार, संजय सांगळे, शोभा आरुडे, रोहिणी पवार, उज्वला थिटे आणि भूगोल फाउंडेशन यांनी मोफत वृक्ष उपलब्ध करून दिले.

शाळेतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीचे पालक नितीन बागुल यांनी शाळेसाठी खत स्वतः गोळा उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलनाना वाळुंज यांनी केले, सूत्रसंचालन प्रा डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी केले तर आभार संदीप बेंडुरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.