Dehuroad Corona Update : चिंताजनक ! देहूरोडमध्ये आज 27 पॉझिटिव्ह रुग्ण; 20जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज गुरुवारी (दि.1) 27 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1629 इतकी झाली. तर कोरोना उपचारातून बरे झालेल्या 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.  

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज,रात्री साडे आठ वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1629 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज मिळालेल्या आकडेवारीनुसार संकल्प नगरी येथे 4, पोलीस लाईन, झेंडे मळा आणि शितळानगर नंबर एक येथे प्रत्येकी 3 रुग्णांची नोंद झाली.

थॉमस कॉलनी, एल्लोरा सोसायटी, शिवाजी नगर, आंबेडकरनगर व मेन बाजार येथे प्रत्येकी 2 तसेच सर्वत्र नगर, इंद्रपूरम, बारलोटा नगर आणि दत्तनगर येथे प्रत्येकी एक अशा एकूण 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

तर कोरोना आजारातून बरे झालेल्या 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 9 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत एकूण 1454 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये 84 रुग्ण असून हद्दीत एकूण 139 सक्रिय रुग्ण आहेत.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या 45 रुग्ण दाखल आहेत. हिंजवडी येथील विप्रो डीसीएचसी येथे 1 रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनामुळे आजपर्यंत 36 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.