Dehuroad News : भंडारा डोंगरावर अखंड गाथा पारायण सोहळ्याला प्रारंभ

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर (Dehuroad News) माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंतपंचमीच्या निमित्ताने गेली 70 वर्षांपासून सुरु असणा-या अखंड हरीनाम सप्ताहास व गाथा पारायण सोहळ्यास मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाच्या वातावरणात गुरुवार (दि. 26) पासून सुरुवात झाली.

पहाटे काकडा आरती, अभिषेक, महापूजा संपन्न झाली. या महापूजेसाठी वैराग्यमूर्ती हभप शंकर महाराज मराठे, हभप सुदाम महाराज भोसले बाबा, गाथा पारायण व्यासपीठाचे नेतृत्व करणारे हभप नाना महाराज तावरे, भंडारा डोंगर पंचक्रोशीतील सरपंच व सदस्य, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव काशीद, ट्रस्टचे सर्व सदस्य व पारायणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेले हजारो भाविक उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी यावर्षी या सोहळ्याची सुरुवात होत असल्याने श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर ट्रस्टच्या वतीने ध्वजारोहन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वजाला उपस्थित सर्व वारकरी भाविकांनी मानवंदना दिली.

श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरु आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर या मंदिर निर्माणाचे काम देखील गतीने सुरु झाले असून (Dehuroad News) आजअखेर या मंदिराचे जवळ जवळ निम्म्यापर्यंत मंदिराचे काम भाविकांना दिसू लागले आहे. भंडारा डोंगरावरील हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे पवित्र कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावे याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार महाराज मंडळी तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे समाजजीवनात कार्यरत असणारे सर्व लहानथोर या मंदिर निर्माणाच्या कार्याला मदत करीत असून मंदिराचे काम मोठ्या प्रमाणात आकार घेऊ लागल्याने भाविकांनी देखील या सोहळ्यासाठी पहिल्या दिवसापासूनच मोठी गर्दी केली आहे.

Pune News : स्वयं चार्जिंग ‘पाय-कार’ निर्मितीसाठी पुण्यात जर्मनीची मोठी गुंतवणूक

सकाळी 7 वा. हभप नानामहाराज तावरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली पंचम वेद असणा-या संत तुकोबारायांच्या गाथेचे पारायण सुरु करण्यात आले. या पारायणासाठी सालाबादप्रमाणे कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश आदी राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेले हजारो भाविक सामील झाले आहेत. सायंकाळी 4.30 ते 6.30 या दरम्यान भागवताचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे पसायदानावर निरुपण झाले. रात्री 8 ते 10 या कालावधी मध्ये हभप पोपटमहाराज कासारखेडेकर यांची कीर्तन सेवा झाली.

या कीर्तनप्रसंगी कासारवाडी येथील श्री दत्तसेवा साई कुंज आश्रमचे मठाधिपती श्री शिवानंद स्वामी महाराज उपस्थित होते. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्यावतीने सर्व भाविकांसाठी पूर्ण सप्ताहाच्या कालावधीमध्ये सकाळच्या न्याहारीसह दुपारी व रात्री असे दोन वेळा भव्य-दिव्य अशा भोजन मंडपात महाप्रसादाची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.