Dehuroad News : ट्रॉलीत असलेल्या मालासह 4.25 लाखांच्या ट्रॅक्टरची चोरी

एमपीसी न्यूज – ट्रॉलीत असलेल्या मालासह 4 लाख 25 हजार रुपये किमतीच्या ट्रॅक्टरची चोरी केली. देहूगावच्या विठ्ठलवाडी येथील  जिल्हा परिषद शाळा येथील मोकळ्या जागेतून 11 ते 15 एप्रिल रोजी ही चोरी झाली.

याबाबत आदिनाथ अशोक काळोखे (वय 23, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चार लाख रुपये किंमतीचा एमएच 14 जेई 2138 हा ट्रॅक्टर व त्याला असलेली ट्रॉली ज्यामध्ये 25 हजार रुपये किंमतीच्या मालाची चोरी झाली. असे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.