Moshi Business News: अक्षय्य तृतीयेनिमित्त ‘भोसले प्राईड’मध्ये खास ऑफर, फ्लॅट बुकिंगवर स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क माफ

एमपीसी न्यूज – मॉडर्न लाईफ स्टाईलला केंद्रस्थानी ठेवून मोशीच्या सुंदर परिसरात ‘भोसले प्राईड’ हा अतिशय विलोभनीय गृहप्रकल्प साकारला आहे. भोसले असोसिएट्सचे संचालक गणेश भोसले यांनी अद्ययावत सोयींनी सुसज्ज हा नवा प्रकल्प उभारला आहे. या गृहप्रकल्पातील ‘ए’ बिल्डिंगचे काम नुकतेच वेळेत पूर्ण करून ग्राहकांना त्याचा ताबा सुद्धा देण्यात आला. याच गृहप्रकल्पातील ‘बी’ बिल्डिंगचे कामही पूर्ण झाले आहे. 

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त ‘भोसले प्राईड’तर्फे ग्राहकांना खास ऑफर देण्यात आली असून, पहिल्या दहा ग्राहकांच्या फ्लॅट बुकिंगवर स्टॅम्प  ड्युटी आणि नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. ही ऑफर मर्यादित असून, प्रथम येणा-यास प्राधान्य या प्रमाणे ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.

शांत, स्वछ परिसर तसेच पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण आणि मरकळ या औद्योगिक केंद्रांपासून अगदी जवळ असणारा हा गृहप्रकल्प सर्वांच्याच पसंतीला उतरत आहे. पुणे- नाशिक महामार्गाच्या दुतर्फा झपाट्याने विकसित होत असलेल्या भागातील ‘भोसले प्राईड’ हा गृहप्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हिंजवडी व तळवडे आयटी पार्कपासून हा गृहप्रकल्प फक्त 10 ते 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. लोहगाव विमानतळ, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र व नियोजित सफारी पार्कपासून हा प्रकल्प अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

हा परिसर अत्यंत झपाट्याने विकसित होत असल्याने ‘भोसले प्राईड’ मध्ये घर घेणं म्हणजे भविष्याचा वेध घेत केलेली सर्वांत चांगली गुंतवणूक ठरणार आहे. एकूण 142 सदनिकांचा हा प्रकल्प असून पहिल्या टप्प्यातील 71 सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले असून, बहुतेक ग्राहकांनी येथील नवीन घरात आपले नवजीवन आनंदाने सुरू केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील 71 सदनिकांचेही काम पूर्ण झाले आहे. दोन्ही टप्प्यातील फ्लॅट ‘रेडी पझेशन’ असून बहुतांश फ्लॅटचे बुकिंग झाले आहे. यातील ‘रेडी पझेशन’चे काही मोजकेच फ्लॅट  शिल्लक असून त्याचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो.

“शाळा, महाविद्यालय, अद्ययावत रुग्णालये, शॉपिंग मॉल, उत्तम रस्ते अशा पायाभूत सुविधांबरोबर उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील उपलब्ध असल्याने हा परिसर निवासासाठी सर्वाधिक पसंतीचा ठरत आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्येक दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, हवेशीर व  हिरवेगार आल्हाददायक वातावरण, मुलांना खेळण्यासाठी उद्यान तसेच सामायिक जागेत विजेचा बॅकअप या सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. मॉडर्न लाईफस्टाईचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी ‘भोसले प्राईड’ नक्कीच एक स्मार्ट चॉईस ठरू शकते.

दुसऱ्या टप्प्यातील फ्लॅटच्या बुकिंगलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बी बिल्डिंग मधील  बहुतांश फ्लॅटची विक्री झाली आहे. उर्वरित फ्लॅटसाठी ग्राहकांना गुढीपाडव्यानिमित्त देण्यात आलेल्या खास ऑफरचा लाभ घेता येईल,“ असे संचालक गणेश भोसले यांनी सांगितले.

पत्ता : भोसले प्राईड, गट क्र. 515,  गणपती मंदिरासमोर, बोऱ्हाडे वस्ती, पुणे-नाशिक महामार्ग, मोशी, पुणे – 412 105

संपर्क : 7066031031/  9689730808/  

ई-मेल : [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.