Dehuroad : शिवसेनेतर्फे कोरोना योद्धयांचा सन्मान, होमियोपॅथिक गोळ्या आणि सॅनिटायझरचे वाटप

Shiv Sena honors Corona warriors, distributes homeopathic pills and sanitizers

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन सुरक्षेचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त कोरोना संकट काळात योगदान देणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन, डॉक्टर, पोलीस, पत्रकार, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था-संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

तसेच नागरिकांना मोफत आर्सेनिक अल्बम ३० या होमीयोपॅथीक गोळ्या आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, राष्ट्रीय काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदी पक्षातील कोरोना योद्धयांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी सुनीता जोशी, कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत, अभियंता प्रवीण गायकवाड, सॅनिटरी इन्स्पेक्टर किरण गोंटे, सय्यद मोहम्मद यांचा मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, सारीका नाईकनवरे, हजीमंलग मारीमूतू, गोपाळ तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, राहुल बालघरे, ऍड. अरूणा पिंजण यांचासुद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजूभाऊ खांड़भोर, जिल्हा उपप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे उपस्थित होते.

मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, महिला संघटक सुनंदा आवळे, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे उपस्थित होते.

यानंतर श्री शंकर मंदिर येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे पत्रकार, विविध सामाजिक व सेवाभावी संस्था, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कोरोना योद्धयांचा सन्मानपत्र, आर्सेनिक अल्बम ३० या होमीयोपॅथीक गोळ्या आणि सॅनिटायझर देऊन सन्मानीत करण्यात आले.

बजरंग दल, देहूरोड गुरुद्वारा, देहूरोड मुस्लिम समाज, आझाद मित्र मंडळ, नायडू गणपती मंदिर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड, इंद्रपालसिंग रत्तू, यांच्यासह त्रिशूल मित्र मंडळाचे धनंजय मोरे, शिवाजी दाभोळे आदी कोरोना योद्धयांचा गौरव करण्यात आला.

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राजेंद्र शेलार, महेश धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, कामगार नेते अरूण गोंटे, जेष्ठ शिवसैनिक देवा कांबळे, विलास हिनकुले, दिलीप गोसावी, महिला आघाडीच्या माजी संघटक लक्ष्मी अक्का मिनगी, विभागप्रमुख विजू थोरी, राजेंद्र तरस, विशाल दांगट, मेहेरबान सिंग, शशीकांत सप्पागुरू, बायडाबाय जगताप, चंदू मासे, सागर मुंडास, दीपक दलाल, लालचंद शर्मा, जयन नायर, जावेद शेख, सोपान देवरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.