Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या दौऱ्याला सुरुवात; विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पिंपरी-चिंचवड शहरातील दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, भुमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येत आहे.

नाशिक फाटा येथे कासारवाडी एसटीपी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रुग्णालयाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या निवासस्थान इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी, अजमेरा येथे सेन्ट्रल मॉलजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाचेही उद्घाटन झाले आहे.

Alandi : संतांचा समृद्ध वारसा स्वामी गोविंदगिरी महाराज पुढे चालवत आहेत – नीलम गोऱ्हे

आता दत्त मंदीर रस्ता, माऊली चौक, वाकड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचे भूमीपूजन तसेच एम. एम. चौक डी मार्ट शेजारी, काळेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनसाठी उभारण्यात आलेले काळेवाडी ट्रान्सफर स्टेशनचे उद्घाटन संपन्न होणार आहे. श्रीकृपा सोसायटी शेजारी, आनंदनगर, सांगवी येथील नुतनीकृत जलतरण तलावाचे लोकार्पण आणि सार्वजनिक बांधकाम मैदान (पी. डब्लू. डी. मैदान) जुनी सांगवी येथे मॅकेनिकल (Ajit Pawar) स्वीपर्सद्वारे रस्ते स्वच्छता कार्यक्रमाचा शुभारंभही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.